अहमदनगरमध्ये चाललंय काय? तरुणाने शाळेत घुसत विद्यार्थिनीस केली मारहाण, दुसऱ्या घटनेत मारहाण करत अत्याचार

बदलापूर येथील अत्याचार प्रकारानंतर अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात मोठी संतापाची लाट उसळली. एकीकडे त्याचा निषेध सुरु असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
crime

Ahmednagar News : बदलापूर येथील अत्याचार प्रकारानंतर अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात मोठी संतापाची लाट उसळली. एकीकडे त्याचा निषेध सुरु असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

एका घटनेत एका शाळेत येऊन अज्ञात तरुणाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीला मारहाण केली. ही घटना तिसगाव येथील एका शाळेत घडली. तर दुसऱ्या घटनेत २० वर्षीय महिलेस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली.

अधिक माहिती अशी : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका शाळेत एक तरुण घुसला. त्याने अकरावीत शिकणाऱ्या मुलीला मारहाण केली. विद्यालयाची बदनामी होऊ नये म्हणून पोलिसांसमक्ष संबंधित तरुणाचा माफीनामा लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाकडून झाला आहे.

बदलापूर येथील घडलेल्या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली असून, शिक्षणमंत्र्यांसह संस्थाचालकदेखील अलर्ट झाले आहेत. शाळा विद्यालय परिसरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक नियमावली आखली जात आहे; परंतु तिसगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

दुसऱ्या घटनेत तू माझ्यासोबत राहा, अन्यथा मी तुझ्या सोबत केलेले व्हाट्सअॅप व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करेल, अशी धमकी देऊन २० वर्षीय महिलेस मारहाण करून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी एक जणाविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज भगवान अब्दुले असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी आणि महीलेचे फोनवर बोलणे सुरु होते. काही महीन्यांनी आरोपी हा पिडीत महीलेला आपण लग्न करु असे म्हणत होता. मात्र महीलेचे पुर्वी लग्न झाले होते. ती सहा महीन्यांपासून आपल्या वडील व भावाकडे रहात होती.

तसेच तिचा पहील्या पतीपासुन घटस्फोट झाला नव्हता त्यामुळे पिडीत महीलेने आरोपी सोबत लग्न करणास नकार दिला. यानंतर अनेक वेळा आरोपी मनोज अब्दुले पिडीत महीलेकडे येऊन लग्न करण्यासाठी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता.

जुलै २०२४ मध्ये चौथ्या आठवड्यामध्ये दोन वेळा पिडीत महीलेवर आरोपीने महिलेची इच्छा नसताना बळजबरीने अत्याचार केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe