अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतरण नेमके कधी होणार? मोठी माहिती समोर

औरंगाबाद, उस्मानाबाद यांचे नाव बदलायला अनेक वर्षे लोटली. पण अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव समोर ठेवताच मुख्यमंत्र्यांनी अवघ्या चाळीस मिनिटांतच त्याची घोषणा करून टाकली.

Ahmednagarlive24 office
Published:
ahilyanagar

Ahmednagar News : औरंगाबाद, उस्मानाबाद यांचे नाव बदलायला अनेक वर्षे लोटली. पण अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव समोर ठेवताच मुख्यमंत्र्यांनी अवघ्या चाळीस मिनिटांतच त्याची घोषणा करून टाकली.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झालेले असेल, असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले. अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतरण होण्याची घोषणा झाली. पण अद्याप त्याबाबत अधिकृत अशी घोषणा झालेली नाही.

त्यामुळे अहिल्यानगर असे नामांतरण होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता आमदार प्रा. राम शिंदे यांनी याबाबत माहिती देताना अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतरण विधानसभेच्या आधीच होणार असे म्हटले आहे.

जामखेड तालुक्यातील चोंडी येथे मंगळवारी (दि.१३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा झाली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे होते.

यावेळी शिंदे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण करायला ४० वर्षे लागली. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मभूमीमध्ये तीनशेव्या जयंतीला सामोरे जात असताना आपण मागणी केली की या जिल्ह्यात अहिल्यादेवींची जन्मभूमी आहे.

त्यामुळे जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करावे आणि अवघ्या चाळीस मिनिटांत नामकरणाची घोषणा झाली. दुसऱ्या जयंतीला त्याची कार्यवाही करून मुख्यमंत्री इथे हजर राहिले. प्रस्ताव दिल्लीला गेला.

पुण्यतिथिनिमित्त तुम्हाला सांगतो की, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर होणार म्हणजे होणारच, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार रामहरी रूपनवर,

धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. चिमणभाऊ डांगे, श्रीराम पुंडे, बबनराव रानगे, डॉ. अलकाताई गोडे, सुभाष सोनवने, सुनील वाघ, संगीता खोत, गडदे महाराज यांच्यासह राज्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe