वकील महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरला, अहमदनगर हादरले

नेवासे तालुक्यातील पाचेगाव येथील खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. जालना येथील एका वकील महिलेने प्रियकराच्या मदतीने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची गळा चिरून अंबादास म्हस्के हत्या केल्याचे त्यात उघड झाले.

Ahmednagarlive24 office
Published:
crime

Ahmednagar News : नेवासे तालुक्यातील पाचेगाव येथील खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. जालना येथील एका वकील महिलेने प्रियकराच्या मदतीने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची गळा चिरून अंबादास म्हस्के हत्या केल्याचे त्यात उघड झाले.

मृतदेह पाचेगाव शिवारात टाकला होता. त्या वकील महिलेसह प्रियकराला नेवासा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून बेड्या ठोकल्या. पोलिसांची पाच विशेष पथके आणि पोलिस निरीक्षक हे स्थानिकांच्या मदतीने हत्येचा तपास करीत होते.

मृतकाची ओळख पटविण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक उज्जैन (मध्य प्रदेश) मधून आले होते. गत आठवड्यात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला होता.

नेवासा, श्रीरामपूर रोडवरील सलग सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना एक गाडी संशयीतरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. या गाडी मालकाची माहिती काढली असता ही गाडी अंबादास भानुदास म्हस्के (रा. रमाबाई नगर, ता. जि. जालना) यांच्या नावावर असल्याचे उघड झाले.

त्याची पत्नी मीना अंबादास म्हस्के ही लोणी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे भाडोत्री खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुरुवारी (२९ ऑगस्ट) त्या महिलेचा शोध घेत पोलिस पथक लोणी येथे पोहोचले.

त्यावेळी मीना अंबादास म्हस्के (वय ३६) हिच्यासह प्रियकर लहू शिवाजी डमरे (वय ३१) यांना ताब्यात घेतले. यानंतर गुन्हाबाबत विचारपूस केला असता लहू डमरे याने त्याचे मीना म्हस्के हिच्यासोबत प्रेमसंबंध असून, तिचा पती अंबादास हा तिला त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत होता.

त्याला पुण्याला कामाच्या ठिकाणी जायचे आहे, असे सांगून एका गाडीत बसवले. त्यानंतर रात्रीच्या वेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर गळा कापला व तिथून निघून गेलो, असे डमरे याने सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

पुण्याला जायचे म्हणून आणले…
आरोपी लहू डमरे याने सांगितले, की माझे व मीनाचे प्रेमसंबंध आहेत. तिचा पती अंबादास भानुदास म्हस्के चारित्र्याचा संशय घेऊन तिला नेहमी त्रास देत होता.

त्याला पुण्याला कामाकरिता जायचे आहे असे सांगून त्यास मोटारीत घेऊन आलो. रात्रीचे वेळी पाचेगाव शिवारात त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा चिरून हत्या केली. त्याला तिथेच टाकून निघून गेलो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe