अजित पवारांनी अकोलेतून डॉ.किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर करून महायुतीचा धर्म मोडला; भाजपचे वैभव पिचड यांचा आरोप

अकोल्यात  जनसन्मान यात्रेनिमित्त जाहीर सभा झाली व या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्या पक्षाकडून डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी जाहीर करून एक प्रकारे महायुती धर्म मोडीत काढल्याची टीका भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी केला आहे.

Ajay Patil
Published:
vaibhav pichad

Ahmednagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीच्या  घटक पक्षांमध्ये अजून देखील जागावाटप झालेली नाही. जागा वाटपाच्या संदर्भात अजूनही चर्चा आणि बैठका सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल याबाबत अनिश्चितता आहे.

परंतु असे असताना देखील सहा ऑक्टोबर रोजी अकोल्यात  जनसन्मान यात्रेनिमित्त जाहीर सभा झाली व या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्या पक्षाकडून डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी जाहीर करून एक प्रकारे महायुती धर्म मोडीत काढल्याची टीका भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी केला आहे.

याबाबत आपण भाजपच्या प्रमुख नेत्यांसह प्रदेशकडे तक्रार दाखल केली व ही बाब महायुतीच्या एकसंधपणाला तडा देणारी असून या कृतीचा मी अकोले तालुका भाजपच्या वतीने जाहीर निषेध करतो असे देखील वैभव पिचड यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकारानंतर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

 अजित पवारांनी महायुतीचा धर्म मोडला भाजपचे वैभव पिचड यांचा आरोप

महायुतीत घटक पक्षांतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी किमान पातळीवर युती धर्म पाळणे आवश्यक आहे. मात्र, ६ ऑक्टोबर रोजी अकोल्यात जनसन्मान यात्रेनिमित्त झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्या पक्षाकडून डॉ. किरण लहामटेंची उमेदवारी जाहीर करून महायुती धर्म मोडीत काढला, अशी टीका भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.

याबाबत आपण भाजपच्या प्रमुख नेत्यांसह प्रदेशकडे तक्रार दाखल केली. ही बाब महायुतीच्या एकसंघपणाला तडा देणारी आहे. या कृतीचा अकोले तालुका भाजपच्या वतीने मी जाहीर निषेध करतो, असेही वैभव पिचड यांनी सांगितले.अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त दौऱ्यावर होते.

त्यांनी जाहीर सभेत अकोल्यातून २०२४ च्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. लहामटे यांच्या नावाची घोषणा केली. अजित पवार यांच्या या महायुतीतील भूमिकेवर भाजपचे इच्छुक उमेदवार वैभव पिचड यांनी संताप व्यक्त केला. यासंदर्भात वैभव पिचड म्हणाले, अकोल्यात अजित पवार यांनीच युतीधर्म पाळण्याचे तारतम्य राखले नाही.

ही बाब महायुतीत वाद निर्माण करण्यास खतपाणी घालणारी आहे. तरी पण महायुतीत मला अकोल्यातून अधिकृत उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिचड पिता-पुत्राने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओकवर भेट घेऊन तुतारी हाती घेण्याच्या वृत्ताचा वैभव पिचड यांनी झ्कार केला.

ते म्हणाले, ते वृत्त चुकीचे होते. अनुसूचित जमातीत धनगर व धनगड एकच आहे, असे भासवून शासन निर्णय काढू नये. पेसा कायद्यानुसार नोकरभरती करावी, या मागण्यांवर राज्यातील आदिवासी समाजातील आजी-माजी आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन केले.

यासाठी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड व मी तेथे हजर होतो. तेव्हा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांना भेटून त्यांची याबद्दलची भूमिका समजावून घेण्याबाबत ठरले. इतर नेत्यांप्रमाणे शरद पवार यांनाही नरहरी झिरवाळ यांच्यासह आम्ही सर्वजण भेटलो. पण ही भेट पक्ष प्रवेशासाठी होती, अशा अफवा माध्यमांकडून आल्या.

आम्ही कालही भाजपसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही भाजपसोबतच राहू, असे त्यांनी सांगितले.महायुती सरकारकडून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली. यातून महिन्याला १५०० रुपये महिलांच्या खात्यात देण्यात येत आहेत.

अकोले मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांनी महिलांना कागदपत्र पूर्ततेसाठी मदत केली. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधीने योजनेला माझी लाडकी बहीण योजना हे नाव दिले. आपली पुढची राजकीय भूमिका काय राहील? या प्रश्नावर भाजप पक्षश्रेष्ठी देतील, त्या आदेशानुसार आपण काम करत राहू, असे वैभव पिचड यांनी स्पष्ट केले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe