सावधान ! एक मनमोहक आवाज तुम्हाला ‘हनीट्रॅप’ च्या जाळ्यात ओढू शकतो…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  सुंदर व आकर्षक तरुणीचा मनमोहक आवाज चांगल्या चांगल्या व्यक्तीला देखील भाळवू शकतो. आणि या आवाजाला भाळलेली व्यक्तीच पुढे हनीट्रॅपची शिकार बनत असल्याच्या घटना आता हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत.

नुकतेच अकोल्यात एक शेतकरी या हनीट्रॅपचा शिकार झाला होता. सुदैवाने पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत. मात्र याचा ओघ आता हळूहळू महसूलमंत्र्यांच्या तालुक्याकडे येऊ लागला आहे.

श्रीमंत माणसांना शोधून व त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणारी महिलांची टोळी संगमनेरात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या टोळीतील काही महिलांनी अकोले तालुक्यातील अंबड येथील एका इसमास ब्लॅकमेल करून त्याच्याकडील मोबाईल व एक हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

याबाबत सदर इसमाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके प्रकरण काय आहे? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ अकोले तालुक्यातील अंबड येथील एक व्यक्ती याचा शिकार बनला होता.

फेसबुकच्या माध्यमातून त्याची संगमनेर येथील एका तरुणीशी ओळख झाली. सदर महिलेने त्याच्यासोबत ओळख वाढवून नंतर संगमनेर येथे भेटीसाठी बोलावले. सदर महिलेने सदर इसमास गणेश नगर येथे तिच्या मावशीच्या घरी नेले.

या घरांमध्ये तीन महिला उपस्थित होत्या. यातील एका महिलेने बोलण्याच्या नादात त्याच्याकडील मोबाईल घेतला. या खोलीत काहीतरी वेगळाच प्रकार चालत असल्याची शंका आल्याने सदर इसमाने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी एका महिलेने दरवाजा बंद करून घेतला.

तिने धमकी देऊन त्याच्याकडील एक हजार रुपये काढून घेतले. यानंतर दोन महिला त्यांच्या स्कुटीवर बसून निघून गेल्या. सदर इसमाने त्यांचा पाठलाग करून अकोले बायपास येथे त्यांना अडविले. आपला मोबाईल परत द्या अशी त्यांनी मागणी केली.

मात्र या महिलांनी त्यास धमकावले तसेच त्यांच्या दोन साथीदारांना तिथं बोलावलं. व ते सर्वजण निघून गेले. याबाबत सदर इसमाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अहमदनगर शहरात काही महिन्यांपूर्वी आणि हनी ट्रॅप प्रकार उघडकीस आला होता संगमनेरातही आता असा प्रकार करणार्‍या महिलांची टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. सदर महिलांनी यापूर्वीही वेगवेगळ्या पुरुषांसोबत असे प्रकार केल्याचे समजते.

मात्र याबाबत कोणी तक्रार केली नव्हती आज सदर इसमाने याबाबत तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी सबंधित महिलांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांना समोर येण्याचे आवाहन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe