कोपरगाव :- वीजचोरीप्रकरणी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांना सोमवारी १७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
वाजे यांच्या समर्थ बर्फ कारखान्यात वीजचोरी होत असल्याचे आढळल्याने २१ लाख ६३ हजार रुपयांच्या बिलाची आकारणी करून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या या कारखान्यावर मुंबईच्या वीज कंपनीच्या भरारी पथकाने छापा टाकला. मीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार केल्याचे आढळले.
वाजे बंधूंनी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच त्यांच्याजवळ असलेला लॅपटॉप वाजे बंधूंना कायमस्वरूपी डिबार करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कळमकर म्हणाले, दोन महिन्यांत नगर जिल्ह्यात कोट्यवधींची वीजचोरी पकडली असून अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
अशा प्रकारच्या वीजचोरीमुळे रोहित्रावरील नुकसान वाढत आहे. त्याचा फटका इतरांना बसतो. उपनगराध्यक्ष वाजे यांना त्यांच्या राहत्या घरी अटक करण्यात आली.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













