नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे विहिरीत आढळला शेतकऱ्याचा दोन्ही हात पाय बांधल्याच्या स्थितीत मृतदेह; घातपात की आत्महत्या?

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल 80 फूट खोल विहिरीत हातपाय दोरीने बांधलेल्या स्थितीत आला असून यामुळे प्रचंड प्रमाणात परिसरात खळबळ उडालेली आहे.

Ajay Patil
Published:
newasa news

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचे आणि घातपाताच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथून समोर आलेली आहे.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल 80 फूट खोल विहिरीत हातपाय दोरीने बांधलेल्या स्थितीत आला असून यामुळे प्रचंड प्रमाणात परिसरात खळबळ उडालेली आहे.ही घटना नेमकी आत्महत्या आहे की घातपात याचा उलगडा आता पोलीस चौकशीनंतरच होणार आहे.

 नेवासा तालुक्यात 80 फूट विहिरीत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

दोन्ही हात दोरीने बांधलेला शतकऱ्याचा मृतदेह ऐंशीफूट खोल विहिरीतील पाण्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात याचा उलगडा चौकशीनंतर होणार आहे. पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात शनिवारी (दि. २१) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.संतराम ऊर्फ संजय उमाजी मतकर (वय ४५, रा. पाचेगाव, ता. नेवासा) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

राहत्या घरापासून अंदाजे चारशे फूट अंतरावरील नंदिनी संजय पवार यांच्या मालकीच्या विहिरीत या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पोलिस पाटील संजय वाकचौरे दोन चिठ्ठया आढळल्या एकाच मजकुराच्या दोन चिठ्ठया घटनास्थळी वेगवेगळ्ळ्या ठिकाणी ठेवल्याचे आढळून आले.या चिठ्ठयांत नेमके काय लिहिले आहे ते मात्र समजू शकलेले नाही.

पोलिसांनी या चिठ्ठया जप्त केल्या आहेत.यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्याचे दोन्ही हात दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते, तर गळ्यालाही दोरीने फास अडकवला होता.

घटनास्थळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चिठ्ठया मिळून आल्या असून, सायंकाळी उशिरा नेवासा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. चिठ्ठयांचा उलगडा झाल्यानंतरच खरा प्रकार समोर येणार आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe