Ahmednagar News : कंटेनर व टेम्पोच्या धडकेत १ जण ठार तर ९ जण जखमी

Published on -

अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनर व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील बाभुळवेढा परिसरात घडली आहे.

याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की लोखंडी सळ्या घेऊन चाललेला कंटेनर (क्र. एमएच १२ एनएच ३१९३) छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरकडे जात होता.

बाबुळवेढा परिसरात एका टाटा एस या टेम्पोला तो मागून घडकला व रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसात जाऊन उलटला. या अपघातात कंटेनरचा चालक अशोक जाधव (वय ३०, रा. निमगाव मायंबा, ता. शिरूर कासार, जि. बीड) हा जागेवरच ठार झाला.

या अपघातात इतर आठ महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये कंटेनरचा क्लीनर विशाल राठोड व नेवासा तालुक्यातील माळीचिचोरा येथील महिला जखमी झाल्या आहेत. या महिला आपल्या रोजच्या कामावरून टेम्पोतून घरी परतत होत्या.

विमल शेंडे, लक्ष्मीबाई शेंडे, वर्षा शेंडे, नंदाबाई शेंडे, अरुणा सुभाष शेंडे, आशाबाई शेंडे, जिजाबाई शेंडे, प्रतिभा मंडलिक या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.बी. काळोखे व वाय. सी. आव्हाड करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News