Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात झाली असून याचाच भाग म्हणून भाजपाच्या माध्यमातून रविवारी जवळपास 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाचा मात्र या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नेवासा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातून भाजप उमेदवाराचे नाव लवकरात लवकरच जाहीर करावे अशी मागणी तालुक्यातील भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली.
परंतु नेवासा मतदारसंघ हा शिंदे सेनेला सुटेल अशा पद्धतीची चर्चा सुरू असल्याने आता शंकरराव गडाख यांच्या विरोधामध्ये शिंदे सेनेचा उमेदवार येतो की भाजपाचा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला की भाजपाला
भाजपच्या रविवारी झालेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नेवासे विधानसभा मतदार संघाचा उमेदवाराचे नाव नाही. त्यामुळे रविवारी दुपारी नेवासे तालुक्यातील भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन या मतदार संघावर भाजपचा हक्क असून भाजप उमेदवाराचे नाव लवकर जाहीर करण्याची मागणी केली.
हा मतदार संघ शिंदे सेनेला सुटण्याच्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. माजी मंत्री व नेवाशाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख या विधानसभा निवडणुकीत हाती मशाल घेण्याचे संकेत दिले आहेत.
गडाख कोणत्या पक्षात जाणार या चर्चेला पूर्णविराम मिळणार असला तरी गडाख यांच्या विरोधातील उमेदवार कोण? कोणत्या पक्षाचा असणार याची उत्सुकता मात्र मतदारसंघात आहे. गडाख आघाडी सरकारात जलसंधारण मंत्री होते.मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची तालुक्याची पहिलीच संधी होती.
गडाख गेल्या विधानसभेला अपक्ष निवडून आल्यानंतर ते आघाडी सरकारात उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून मंत्री झाले. यावेळी गडाख कोणत्या पक्षाकडून लढणार याचे औत्सुक्य आज संपले. गेल्या महिनाभरात गडाख यांच्या भाजप, शिंदे सेना प्रवेशाच्या चर्चा घडल्या.
गेल्या आठवड्यात तर गडाख यांचा शिंदेसेनेत प्रवेश होत असल्याचे चर्चेने राजकीय वर्तुळत मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र गडख यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत जाण्याचे निश्चित केले. गडाख यांच्या विरोधात नेमका कोण असणार, हा मतदार संघ भाजपला की सेनेला यावर मोठा खल राजकीय गोटात सुरू आहे.
जिल्ह्यातील दोन मतदार संघ शिंदे सेनेला सोडण्यात आल्याची व त्यात नेवासे मतदार संघ असल्याची चर्चा तालुकाभर आहे. शिंदे सेनेकडे हा मतदार संघ गेलाच, तर पंचगंगाचे प्रभाकर शिंदे किंवा सचिन देसरडा उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.
भाजपकडे मतदार संघ गेल्यास माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे किंवा भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे संभाव्य उमेदवार असू शकतात. हा मतदार संघ भाजपचा आहे. त्यामुळे येथे भाजपचा उमेदवार असणार यावर भाजपचे स्थानिक नेते ठाम आहेत. आमदार गडाख यांच्या विरोधातील कोण? यावर खल सरू आहे.