लाच घेताना रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला अटक

श्रीरामपूर : श्रीरामपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मासिक हप्ता म्हणून चार हजार रुपये घेताना अहमदनगर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की तक्रारदार यांचा श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर मिल्क स्टॉल आहे.

हा स्टॉल चालू राहाण्याकरीता मासिक हप्ता म्हणून पोलीस नाईक वैजनाथ पांडुरंग बडे (वय ३७, नेमणूक श्रीरामपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र, रा. वॉर्ड नं. ७, निर्मल क्लासेससमोर, श्रीरामपूर) याने पाच हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. .

या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर सापळा लावला. यावेळी पंचांसमक्ष चार हजार रुपये बडे याने स्वीकारले. यावेळी त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याचे छायाचित्रही घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment