प्लेग साथीच्या काळात रँडने केलेल्या अत्याचाराचा अनुभव सध्या राज्यातील जनता घेतेय…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-1897 साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहे,

असे ट्विट करून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजवटीची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे.

मनसेच्या या आरोपांना शिवसेना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हला प्रत्युत्तर म्हणून संदीप देशपांडे हेदेखील आज फेसबुक लाईव्ह करणार आहेत.

या फेसबुक लाईव्हमध्ये ते काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आतापर्यंत भाजपने लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता मनसेही भाजपच्या सुरात सूर मिसळणार का, हे पाहावे लागेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe