नेवासा तालुक्यातुन लहान मुलांसह बेपत्ता झालेली महिलेस पोलिसांनी शोधले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथून दोन लहान मुलींसह बेपत्ता असलेल्या महिलेला शोधण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले आहे.(Ahmednagar News)

शितल विठ्ठल बोरुडे (वय 30 वर्षे) असे या महिलेचे नाव असून राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10 वर्ष), तन्वी विठ्ठल बोरुडे (वय 07 वर्षे) असे तिच्या दोन मुलींचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर महिला आपल्या दोन लहान मुलींसह दि.15 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजे पासून बेपत्ता होत्या. याबाबत महिलेचे वडिल बाप्पु रामा निकाळजे (वय 55 वर्षे) यांनी दि.22 डिसेंबर 2021नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली होती.

त्यानुसार नेवासा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल होती. नेवासा पोलीस पथकाने कसोशीने शोध घेतला असता दि.31 डिसेंबर रोजी सदर महिला व तिच्या दोन मुली नेवासा तालुक्यातील गेवराई येथे सुखरुप मिळुन आलेले आहेत.

दरम्यान सदर महिलेने स्वखुशीने दुसरा विवाह केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe