Ahmednagar News:- पती आणि पत्नी यांना संसाररथाचे दोन चाके म्हटले जाते. जेव्हा या दोन्हीं चाकांमध्ये व्यवस्थित संतुलन असते तेव्हाच संसाररुपी रथ व्यवस्थित चालत असतो. परंतु या दोघांमध्ये जर काही समस्या यायला लागल्या तर मात्र हा रथ अडखळतो आणि पूर्ण कोलमडून जातो. लग्न ही एक महत्त्वाची गोष्ट असून या माध्यमातून पती-पत्नी यांच्यामध्ये एक अतूट असे बंधन आणि नाते निर्माण होत असते.
पती-पत्नीतील नातेसंबंध सुमधुर आणि विश्वासार्ह असणे खूप गरजेचे असते. परंतु या नात्यांमध्ये जर नको त्या गोष्टींनी शिरकाव केला तर मात्र पाहता पाहता सगळे नष्ट होते व व्यक्ती विचार देखील करू शकत नाही अशा घटना घडून येतात.
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये जर सगळ्यात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असेल तर ती अनैतिक संबंधांमुळे निर्माण होते. असे म्हटले जाते की अनैतिक संबंधाचा शेवट हा कधीही चांगला होत नसतो व याप्रमाणेच जर पती पत्नी या दोघांमध्ये जर तिसऱ्याने प्रवेश केला तर मात्र या गोष्टीचा शेवट नक्कीच वाईट होतो
व त्याचीच परिणीती संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथे पाहायला मिळाली. या ठिकाणी एका तरुणाने आपल्या पत्नीच्या बाहेरख्याली पणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेतला व जीवनाचा शेवट केला.
पत्नीच्या बाहेरच्या लफड्यांना कंटाळून पतीची आत्महत्या
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यात असलेल्या कवठे कमळेश्वर येथील एका तरुणाचा विवाह एक वर्षापूर्वी झालेला होता. परंतु जिच्याशी त्याचा विवाह झाला तिचे आणि या तरुणाच्या नात्यातील एका व्यक्तीचे अगोदरपासूनच प्रेम संबंध होते व हे संबंधित तरुणाला नंतर कळले.
इतकेच काय तर या दोघांना या तरुणाने रंगेहाथ देखील पकडलेले होते व त्यावेळी मात्र त्याने पत्नीला मारहाण केली होती व पुन्हा नको ते उद्योग करू नकोस अशा प्रकारची समज देखील दिली होती.
परंतु यावेळी देखील त्याच्या पत्नीने नवऱ्याला म्हटले होते की तुझ्याकडून माझे समाधान होत नाही व त्यामुळे मी असे लफडे करते पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता व या महिलेने मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली होती व नंतर घुलेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे ती राहायला आली होती.
बहिणीच्या नवऱ्याला देखील जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला
घुलेवाडी येथे बहिणीकडे राहायला आल्यानंतर देखील या स्त्रीचे नको ते उद्योग थांबले नाहीत. बहिणीच्या घरी आल्यानंतर बहिणीच्या नवऱ्याला जाळ्यात ओढण्याचा तिने प्रयत्न केला व त्याच्यासोबत चाळे सुरू केले. जेव्हा तिच्या बहिणीला हे सगळे प्रकरण समजले तेव्हा आपला संसार उघडा पडू नये म्हणून तिच्या बहिणीने तिला घरातून काढून दिले.
त्यानंतर ती पुन्हा कोपरगाव येथे गेली व त्या ठिकाणी तिच्या सासरी असणारे तिचे पहिले प्रेम कोपरगावला भेटायला येत होते. ती व्यक्ती राजरोसपणे तिला कोपरगावला भेटत होती व अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून देत होती.विशेष म्हणजे या स्त्रीच्या पतीला या गोष्टी कळतील असे मुद्दाम हे दोघेजण वागत होते.
या सगळ्या पत्नीच्या वागण्यामुळे मात्र तिच्या पतीचे मानसिक संतुलन बिडायला लागले होते. गळफास लावण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्या अगोदर या व्यक्तीला त्याने समजून देखील सांगितले की, तू माझ्या बायकोला भेटू नको किंवा तिचा वापर करू नको. पण ही व्यक्ती त्याला म्हणाली की तुझी बायको तुझ्या ताब्यात नाही त्यामुळे तु मला काही बोलू नको.
हे शब्द मयत झालेल्या व्यक्तीच्या फार जिव्हारी लागले व त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. शेवटी त्याने पत्नीला देखील सांगण्याचा प्रयत्न केला व आपल्याला दोन वर्षाचा मुलगा आहे याची आठवण देखील तिला करून दिली.
उगाच आपला संसार उध्वस्त करू नको हे देखील तिला समजावून सांगितले. परंतु त्याही वेळेस तिने काहीही त्याचे न ऐकता तू झुंगाड आहे व तुझ्यात दम नाही असं म्हणून त्याची अवेहलनाच करण्याचे काम केले. शेवटी या व्यक्तीने या साऱ्या गोष्टींना कंटाळून स्वतःला संपवले.
मयत तरुणाच्या आईने हत्येचा केला आरोप
या प्रकरणात मात्र मयत तरुणाच्या आईने ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा आरोप केला असून संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की,जेव्हा मुलाने गळफास घेतला तेव्हा घरी आतून बंद असायला हवे होते.
परंतु घराची कडी बाहेरून लावलेली होती व मुलाच्या गळ्याभोवती एक काळी वायर आणि दुसरी साडी असा दोन वस्तूंचा वापर गळफासासाठी केलेला होता. असा दोन दोनदा गळफास तो एकटा कसा घेऊ शकतो? असा प्रश्न मयत तरुणाच्या आईने पत्रामध्ये उपस्थित केलेला आहे.
तसेच गळफास घेतल्यानंतर तो जमिनीपासून पाच फूट उंचीवर लटकलेल्या अवस्थेत होता व पाच फुटाची एकही वस्तू घरात नाही. तर मग त्याने एवढ्या उंचीवर दोर कसा बांधला? इत्यादी प्रश्न मयत तरुणाच्या आईने पत्राच्या माध्यमातून उपस्थित केले असून त्यामुळे हा अपघात नाहीतर माझ्या मुलाचा घातपात केला असल्याचा आरोप मयत तरुणाच्या आईने केला.