संगमनेर विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखेंऐवजी त्यांच्या पिताजींनी निवडणूक लढवावी! आ.बाळासाहेब थोरात यांचे विखे यांना थेट आवाहन

संगमनेर विधानसभा मतदार संघातून जर डॉ. सुजय विखे यांना निवडणूक लढवायची असेल तर मी त्यांचे स्वागतच करतो.परंतु त्यांच्या ऐवजी जर त्यांच्या पिताजींनी म्हणजेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मधून निवडणूक लढवली तर जास्त चांगले होईल अशा पद्धतीने थेट आव्हानच आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांना दिले आहे.

Published on -

Ahmednagar News: संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापायला लागले असून राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय जोरदार तयारी सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील जागा वाटपाचा प्रश्न अजून देखील निकाली निघालेला नाही व बऱ्याच जागांवर तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात चांगलाच राजकीय संघर्ष रंगणार असे चिन्हे दिसत आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून थेट बाळासाहेब थोरात यांनाच आव्हान देण्याचे संकेत दिले असून ते संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

असे असताना मात्र आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, संगमनेर विधानसभा मतदार संघातून जर डॉ. सुजय विखे यांना निवडणूक लढवायची असेल तर मी त्यांचे स्वागतच करतो.

परंतु त्यांच्या ऐवजी जर त्यांच्या पिताजींनी म्हणजेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मधून निवडणूक लढवली तर जास्त चांगले होईल अशा पद्धतीने थेट आव्हानच आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांना दिले आहे. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून बघितले तर संगमनेर विधानसभा मतदारसंघाची लढत ही संपूर्ण राज्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होईल हे मात्र निश्चित.

. बाळासाहेब थोरात यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना संगमनेर मधून विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे थेट आव्हान

संगमनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी डॉ. सुजय विखे यांचे स्वागतच करतो, त्यांच्या ऐवजी त्यांच्या पिताजींनी संगमनेरमधून निवडणूक लढवली तर जास्तच चांगले होईल, असे आव्हान आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे यांना दिले आहे. संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे आयोजित आदिवासी मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

डॉ. सुजय विखे हे संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता, त्यांनी वरील उत्तर दिले आहे. विधानसभा निवडणूकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीने बैठका घेतल्या असून दसऱ्यापर्यंत बैठका पूर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आ. थोरात हे शेजारच्या सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात या संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे, याबाबत त्यांना विचारले असता, अशा चर्चा कुठून येतात हे समजत नाही. डॉ. जयश्री बाबत निर्णय अद्याप झालेला नसल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस अहमदनगर जिल्ह्यातील सहा जागा लढवणार- बाळासाहेब थोरात यांची माहिती

[ काँग्रेसने अकोले, शिर्डीची जागा मागितली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, अहमदनगर हे विधानसभा कॉग्रेसचेच आहेत. त्यामुळे सहा जागा आम्ही लढविणार आहोत. जिल्ह्यात आम्ही यशस्वी राहू. राज्यात आमच्या १८० पेक्षा जास्त जागा येण्याची परिस्थिती आहे, असा विश्वास काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

बुधवारी (दि.०२) संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे आदिवासी मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण जागांपैकी काँग्रेसचा किती जागांवर दावा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी आमदार थोरात यांना विचारला होता. त्यावर थोरात म्हणाले, पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल.त्यात सर्वाधिक जागांचे निर्णय होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe