संगमनेर येथील ‘त्या’ कारखान्याला ‘वीजचोरी’ करणे पडले महागात….!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स या प्लास्टिक दाने निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या वीजजोडणीची महावितरणच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून १० लाख ५७ हजार ८०० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कारखाना चालविणारे राहुल सोनावणे यांचे विरुद्ध संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स या कारखान्यामध्ये प्लास्टिक दाने निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून, सदर कारखाना राहुल सोनावणे हे चालवीत आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी महावितरणचे भरारी पथक गेले असता.

वीजमीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड करून फेरबदल केल्याचे तपासणीत आढळून आले. मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या कारखान्यात विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत एकूण ८२ हजार ९६९ विद्युत युनिटची म्हणजे एकूण १० लाख ५७ हजार ८०० रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांच्या फिर्यादीवरून राहुल सोनावणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe