Ahmednagar News: सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बलात्कार तसेच महिला व लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत असून या घटना पाहून हा तोच संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागला आहे.
महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक, सामाजिक आणि संत परंपरेचा ठेवा असलेल्या राज्यात अशा प्रकारच्या घटना घडणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशीच एक लाजिरवाणी आणि तितकीच संतापजनक व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना संगमनेर शहरापासून जवळ असलेल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे.
या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वर्ग शिक्षकाने इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडला व या शिक्षकावर आता शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळासाहेब यशवंतराव बांबळे असे या विकृत शिक्षकाचे नाव आहे व त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नऊ वर्षाच्या मुलीसोबत शिक्षकांनी केले अश्लील चाळे
संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावात जिल्हा परिषदेच्या वर्ग शिक्षकाने इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी या ‘चावट’ शिक्षकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळशिराम यशवंतराव बांबळे (रा. डोळासणे, तालुका संगमनेर) असे या विकृत शिक्षकाचे नाव असून त्याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी नऊ वर्षे वयाची पिडीत मुलगी नेहमीप्रमाणे मंथन क्लासच्या मुलीसोबत तिचा राहिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी गेली होती व ती रोजच्याप्रमाणे ११ ते ५ या शाळेच्या वेळेत वर्गात बसली होती.
त्यानंतर सदर पीडित मुलगी तिच्या दोन मैत्रिणींना घेऊन पळत तिच्या घरी गेली. तू घरी का आली? असे तिच्या आईने विचारते हा तिने दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर ती शाळेत जेवण करून वर्गातील बाकावर ठेवलेल्या दप्तरातील पाण्याच्या बाटलीतील पाणी पिण्यासाठी वर्गात गेली असता वर्गशिक्षक बांबळे हा वर्गात खुर्चीत बसलेला होता.
त्याने तिला पाठीमागून येऊन तिच्या कमरेला हात लावून तिच्या अंगावरुन हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शाळा गाठत मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पिडीत मुलीच्या मैत्रिणींना कार्यालयात बोलावून चौकशी केली असता सदर बांबळे या शिक्षकाने इतर मुर्लीच्या बाबतीतही असाच प्रकार केल्याचे मुलींनी सांगितले.
बाळशिराम यशवंतराव बांबळे हा नवीन शिक्षक शाळेत आल्यापासून नेहमी आम्हा मुलींच्या अंगावरुन हात फिरवत नको त्या ठिकाणी हात लावत असतात, असे मुलींनी सांगितले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात शिक्षक बाळशिराम यशवंतराव बांबळे याच्याविरुद्ध बाललैंगिक अपराध, बाल संरक्षण अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.