अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-एका सामान्य साखर कामगाराच्या मुलाला काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या युवक आघाडीचं जिल्हाध्यक्ष करायची ताकद ही फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
स्मितलभैय्या वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, डॉ.रिजवान अहमद, डॉ.दिलीप बागल, सय्यद खलील, नलिनीताई गायकवाड, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,
युवक काँग्रेसचे नगर तालुका अध्यक्ष अक्षय कुलट, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेसचे चिरंजीव गाढवे, प्रमोद अबुज, अमित भांड आदींची प्रमुख उपस्थिती होती. काळे पुढे म्हणाले की, स्मितलभैयां सारख्या सामान्य कुटुंबातील युवकाला जिल्हाध्यक्ष करण्याचे काम प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी केले आहे.
सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका नामदार बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांची आहे. यावेळी बोलताना जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफरे म्हणाले की, स्मितलभैय्या जिल्ह्यामध्ये युवकांची संघटना सक्षमपणे बांधतील. त्यांनी लवकरात लवकर जिल्ह्याचा दौरा पूर्ण करत युवक संघटनेचा आढावा घ्यावा. गाव तिथे काँग्रेस आणि वार्ड तिथे शाखा हा कार्यक्रम करावा युवक काँग्रेसने राबवावा.
यावेळी यश भोंगे, जाहिद अखतार, इम्रानभाई बागवान, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, महेश लोंढे, प्रशांत जाधव, संकेत लोकरे, मयुर सोनवणे, केतन खरपुडे, सागर बोराडे, गोपाल नायडू, आदित्य यादव, मनोज उंदरे, मयूर सोनवणे, आदित्य यादव, महेश लोंढे, अमित मोमीन, अभिजीत कुलकर्णी आदीसह काँग्रेस पक्ष, विविध फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved