अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्री साईंचा श्रद्धा सबुरी चा संदेश देत व साई नामाचा जय जयकार करत असंख्य भगवे झेंडे, भव्य श्रीसाई मूर्ती असलेला रथ, टाळकरी ,वाजंत्री, भालदार चोपदार यांच्या समवेत शिर्डी मध्ये आज रविवार 15 मार्च रोजी शिर्डी साई परिक्रमा कोरोनोला न घाबरता मोठ्या उत्साहात व साईंच्या भक्ती पुढे कोणत्याही शासकीय आदेशाला न जुमानता साईंची भक्ती श्रेष्ठ समजून हजारो साईभक्त ,व ग्रामस्थांनी ती पूर्ण करून या शिर्डी साई परिक्रमेच्या नव्या प्रथेला मोठ्या आनंदात सुरुवात केली,
ग्रीन शिर्डी, क्लीन शिर्डी फाउंडेशन,व शिर्डी ग्रामस्थ साई भक्त यांच्या आयोजनातून आज सकाळीच ठीक सात वाजता येथील श्री खंडोबा मंदिरापासून ह्या शिर्डी परिक्रमेला श्री साईं चे पूजन करून सुरुवात झाली ,सरला बेट चे महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्यासह काशी का नंदजी महाराज, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच शिर्डीच्या नगराध्यक्ष अर्चना ताई कोते, कैलास बापू कोते, विजू कोते, कमलाकर कोते, सचिन तांबे नितीन कोते ,गोपीनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर निलेश दादा कोते ,सुनिल परदेशी आदींसह अनेक मान्यवरांनी श्री साई रथाचे व पालखीचे दर्शन घेवून या परिक्रमेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली,
श्री खंडोबा मंदिरापासून नगर-मनमाड महामार्गाने पोलीस स्टेशन समोरील पूर्व बाजूच्या शिव रस्त्याने ही परिक्रमा थेट शिवसेन आश्रमा जवळून बिरोबा बनात आली ,येथे श्री बिरोबा महाराजांचे साईभक्तांनी दर्शन घेऊन ही परिक्रमा नंतर परत एस व्ही आर हॉटेल जवळ नगर मनमाड रस्ता क्रॉस करून शिर्डी साकुरी शिव रस्त्याने शिर्डीच्या पश्चिम बाजूच्या शिर्डी साकुरीया शिव रस्त्याने काकडी विमानतळ रोडला आली ,नंतर ही परिक्रमा द्वारावती निवासस्थानाजवळ वून परत श्री खंडोबा मंदिर जवळून थेट श्री द्वारकमाई मंदिरासमोर आली ,येथे सर्व परिक्रमेतील साई भक्तांनी श्री साईंची दुपारची मध्यान आरती केली व त्यानंतर श्री साई दर्शन घेऊन या शिर्डी पराक्रमाची उत्साहात सांगता झाली ,
या शिर्डी परिक्रमेत अनेक श्री पुरुष महिला मुले व वृद्ध साईभक्त ही सामील झाले होते अनेकांच्या डोक्यात शिर्डी परिक्रमा 20 20 असे लिहिलेल्या गांधी टोप्या मोठ्या आकर्षक दिसत होत्या, तसेच या परिक्रमेत छत्रधारी श्री साईंची भव्य मूर्ती ची ची सवाद्य मिरवणूक ही उदीच्या सुगंधी वातावरणात ,भालदार चोपदार यांच्या वेषातील सेवेक रांच्या हातातील भगवे झेंडे, भजन, महिलांच्या फुगड्या , यांच्या उपस्थितीत सुरू होती, ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती ,ही परिक्रमा सुमारे चौदा किलोमीटरची असून या परिक्रमेला सकाळी सात वाजता सुरुवात होऊन दुपारी बारा वाजता या परिक्रमेची उत्साहात सांगता झाली ,
या परिक्रमा मार्गावर जागोजागी परिक्रमा करणाऱ्या साईभक्तांचे ,ग्रामस्थांचे स्वागतासाठी रांगोळ्या , स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या, ठीक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती या परिक्रमेत सरलाबेट चे मंहत रामगिरीजी महाराज यांचेही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होते, तसेच अनेक ठिकाणी या परिक्रमा धारकांसाठी पाणी ,चहा, सरबत लस्सी ,पोहे ,खिचडी ,केळी आदी ग्रामस्थां मार्फत व संयोजकां मार्फत ठेवण्यात आले होते,
तसेच ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती, या परिक्रमेत हजारो साईभक्त ,ग्रामस्थ स्वतःहून सहभागी झाले होते, कोरोनो आजाराची कसलीही ही भीती न बाळगता श्री साईंवर श्रद्धा ठेवून साईभक्तांनी व ग्रामस्थांनी ही परिक्रमा पूर्ण केली ,या परिक्रमेत साई दरबार गाजियाबाद दिल्ली येथील सुमारे चारशे ते पाचशे साईभक्त ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, साई दरबार गाजियाबाद येथील साईभक्तांनी गेल्या नऊ वर्षापासून या शिर्डी परिक्रमेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती,आज याच परिक्रमेला आज ग्रामस्थ ,साईभक्त यांच्या सहकार्याने भव्यदिव्य असे मोठे स्वरूप प्राप्त झाले
ही परिक्रमा यापुढे कायम स्वरूपाची होत राहील असे साईभक्त बोलत होते, या परिक्रमेबद्दल बोलताना सरला बेट चे मंहत रामगिरी महाराजांनी देशात नर्मदा परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा, गोदावरी परिक्रमा तसेच विविध ठिकाणी धर्मिक क्षेत्री परिक्रमा होत असतात, त्याचप्रमाणे शिर्डी परिक्रमा यापुढे महत्वाची ठरणार आहे, असे सांगितले ,यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी या परिक्रमेचे कौतुक करत श्री साईंवर श्रद्धा ठेवून अनेक साईभक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वतहून या परिक्रमेत सहभागी झाल्याचे व सर्वांना त्यातून मानसिकआत्मिक समाधान मिळत असल्याचे सांगितले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com