शिर्डी : राजस्थानमधील मोस्ट वॉंटेड कुख्यात टोळीचा म्होरक्या कमलसिंग राणा याच्यासह त्याच्या चार साथीदारांच्या मुसक्या राजस्थान व शिर्डी पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत आवळण्यात आल्या.
पाचही आरोपींना शिर्डीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली. मिटके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ते म्हणाले, राजस्थान व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या बॉर्डरवर कूप्रसिद्ध असलेली कमल सिंग गँग शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आश्रयाला आल्याची माहिती गृप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे जयपूर पोलीस आणि शिर्डी पोलीस यांनी संयुक्त कार्यवाही करत त्यामधील पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधील निमच या ठिकाणी राजस्थानमधील चितोडगड जिल्ह्यातील निंबा हेडा या पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकावर फायर करून सरकारी पिस्तूल पळवून नेण्यात आलं होतं.
त्यानंतर या आरोपींचा शोध सुरू होता. या गुन्ह्यातील पाच आरोपी शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये आश्रयाला आले होते. त्या माहितीच्या आधारे टेक्निकल अऑनालिसिस करून त्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्य आरोपी कमलसिंग डुंगरसिंग राणा (वय ४०) हा या अगोदर भारतीय दंड संहिता ३०२ या गंभीर गुन्ह्यात फरार आरोपी आहे. त्याच्यावर राजस्थान पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवलेले होते.
त्यासोबतच मध्यप्रदेश धील एका गुन्ह्यात तो फरार असताना मध्यप्रदेश पोलिसांनीदेखील त्याच्यावर २० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यानंतर सत्येंद्रसिग भारतसिंग (वय २९) आणि ओमप्रकाश उर्फ गुड्डा काळूराम दावत (वय३०) हे तोन आरोपी फरार होते.
यांच्यासह वौरेंद्र हरिसिंग जाट (वय ३५ ) आणि चंद्रसिंग भवरसिंग (वय ३०) अशा पाच आरोपींना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी पोलीस आणि जयपूर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतलेले आहे.
या कारवाईत शिर्डी क््युआरटी पथकाची भमिकाही महत्वाची होती. शिर्डीमध्ये एक दिवस अगोदर ते आश्रयाला आले होते. टोळीप्रमुख कमलसिंग डुंगरसिंग राणा हा अतिशय सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध प्रकारचे ३७ गुन्हे दाखल आहेत.
त्यामध्ये खून, दरोडा, एनडीपीएस, आर्म अँक्ट, जबरी चोरी असे अतिशय गंभोर स्वरूपाची गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. आरोपींकडे शस्त्र असण्याची दाट शक्यता होती. त्या अनुषंगाने क्युआरटी पथकाची मदत घेण्यात आली.
या टीमने या कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. सुदैवाने आरोपींकडे शस्त्र आढळले नसल्याचे मिंटके यांनी सांगितले. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,
उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, कॉन्स्टेबल डाके, रिजवान शेख, पोलीस नाईक गोमसाळे, कॉन्स्टेबल जराड, गोंदे आदींनी केली.