Ahilyanagar News:- राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यकाळामध्ये किंवा यांच्या राजकीय कार्यकाळात केव्हा कोणत्या वेळेला काय राजकीय उलथापालथ होईल याचा कुठलाही प्रकारचा नेम नाही. त्याचे प्रत्यंतर या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेळोवेळी येताना आपल्याला दिसून येत आहे.
याचे ताजे उदाहरण आपल्याला आता श्रीरामपूर मतदारसंघाच्या माध्यमातून सांगता येईल. आपल्याला माहित आहे की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून या ठिकाणचे विद्यमान आमदार हे काँग्रेसचे आहेत. परंतु काँग्रेसने मात्र या ठिकाणी उमेदवारी देताना विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले व या ठिकाणी हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली.

यानंतर मात्र लहू कानडे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले व त्यांनी मुंबईत तळ ठोकला व महायुतीकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली व या सगळ्या प्रक्रियेला श्रीरामपूर मधील स्थानिक नेत्यांचे देखील पाठबळ मिळत गेल्याने लहू कानडे महायुतीच्या गळ्याला लागले व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांना आता जवळपास उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
लहू कानडे यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. या ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी देताना विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले व काँग्रेसने या ठिकाणी ससाने गटाचे हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर केली.
त्यानंतर मात्र लहू कानडे ॲक्शन मोडमध्ये आले व त्यांनी मुंबईत ठोकून महायुतीकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली व त्यामध्ये त्यांना आता यश आले असल्याचे दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर महायुतीतून श्रीरामपूरची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे होती.
परंतु ती आता अजित पवार यांना मिळाली आहे. शिवसेनेकडून या ठिकाणी इच्छुकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर होती व एखाद्या वेळी या ठिकाणी शिवसेनेत बंडखोरी होऊ शकली असती. त्यामुळे ही बंडखोरी टाळण्याकरिता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली.
आमदार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर श्रीरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित आहे. आमदार लहू कानडे यांनी 24 तासात महायुतीकडून उमेदवारी मिळवल्याने राज्याच्या राजकीय पातळीवर याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
आमदार लहू कानडे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळताच त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात जागोजागी फटाके फोडून जल्लोष केला. आमदार लहू कानडे दुपारी मेळाव्याचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन देखील करणार आहेत व लगेचच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यामुळे आता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये लहू कानडे आणि काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यात रंगतदार लढत होणार हे मात्र निश्चित. परंपरागत जर पाहिले तर हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता.
परंतु अचानक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी एन्ट्री घेतली व त्यांच्या पक्षाला ही जागा गेल्यामुळे आता महायुतीने श्रीरामपूर मध्ये राजकीय खेळी खेळली असल्याची आता चर्चा रंगली आहे. यामागे श्रीरामपूर मधील स्थानिक नेत्यांचे पडद्यामागील राजकारण असल्याचे बोलले जात आहे.