Shrirampur District : महाराष्ट्रात २२ नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी शासन विचारधीन आहे. नुकतेच अयोध्या प्रभू श्रीरामचंद्रांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे.
त्यामुळे शासनाने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषाचे आधारे होण्यासाठी अर्थ संकल्पीय अधिवेशनात जिल्हा विभाजन विधेयक एकमताने मंजूर करावे.
त्यासाठी तरतूद करून येत्या श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा जाहिर करावा, असे प्रतिपादन श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.
श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठानकडून येथील मेनरोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३७४ व्या जयंती निमित्ताने राजेंद्र लांडगे बोलत होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी अभिवादन केले.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन बडदे, शिवसेना नेते माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, भाजपा नेते गणेश राठी, माजी नगरसेवक सुधीर वायखिंडे, शरदचंद्र पवार गटाचे लकी सेठी, भाजप शहराध्यक्ष राठी, श्रेयस सुवर्णपत्की, संघर्ष समिती उपाध्यक्ष अॅड. सुभाष जंगले,
कार्याध्यक्ष भागचंद औताडे, वकील समन्वयक अॅड. बाबा शेख, कामगार नेते नागेश सावंत, साहित्यिक सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, राजेंद्र मोरगे, अशोक बागुल, मोहन नारंग, नंदकिशोर आरोटे, ज्ञानेश्वर गव्हाणे, दीप गलवणी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास तेजस बोरावके, मिलिंद साळवे, अभिजीत बोड़ें, सिद्धांत छल्लारे, सुरेश थोरे, रोहित नाईक, अकील पठाण, उमेश छल्लारे, एम. एस. गायकवाड, योगेश धसाळ, किशोर फाजगे, प्रभाकर जऱ्हाड, गोरख आव्हाड, दिपक जवळकर, फारूक पटेल, किशोर चौधरी, निलेश गीते, अशोक अभंग, गोरख आढाव आदी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र लांडगे म्हणाले, येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महसूलमंत्री स्थानिक प्रतिनिधींना भेटणार आहोत. या अधिवेशनात तरी शासन जिल्हा विभाजन विधेयक एकमताने मंजूर होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा जाहिर झाल्यास तो ऐतिहासिक निर्णय होईल.