Ahmednagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून निवडणुकीसाठी तिकीट मिळावे याकरिता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी वाढताना दिसून येत आहे.त्यामुळे आता पक्षांच्या माध्यमातून इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू आहे. अशाच प्रकारच्या मुलाखती या अहमदनगर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून इच्छुक असलेल्याच्या पार पडताना आपल्याला दिसून येत आहेत.
अशाच प्रकारे इच्छुकांच्या मुलाखती भाजपाच्या माध्यमातून देखील नुकत्याच पार पडल्या व या मुलाखती दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते व भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. अगदी याच पद्धतीची घटना काँग्रेस पक्षाच्या बाबतीत देखील पाहायला मिळाली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये पार पडल्या. परंतु या मुलाखती दरम्यान पक्षनिरीक्षकांसमोरच काँग्रेसमधील गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत सलोखा हवा तितका चांगला नसल्याची बाब समोर आली.
त्यामुळे आता ज्या गटांनी घोषणाबाजी केली अशा गटातील कोणालाही उमेदवारी देऊ नये अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर असून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील त्या प्रकारची मागणी केली जात आहे.
या मुलाखती दरम्यान आमदार लहू कानडे व करण ससाने समर्थक समोरासमोर आल्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते व त्यातल्या त्यात हेमंत उगले समर्थकांनी देखील घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला व श्रीरामपूर मधील काँग्रेस गटांमध्ये मोठी गटबाजी असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.
श्रीरामपूर मधून काँग्रेस देणार नवीन चेहऱ्याला संधी?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती शिर्डी येथे पार पडल्या. यावेळी पक्ष निरीक्षकांच्यासमोर काँग्रेसमधील गटांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतीमा मलिन झालेली आहे. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या गटातील कोणाला उमेदवारी देऊ नये, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहे.
त्यामुळे श्रीरामपूरमधून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. तशीच चर्चा आता काँग्रेसच्या गटात सुरु झालेली आहे. शिर्डी येथील हॉटेलमध्ये काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी पक्षनिरीक्षक महारष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मजफ्फर हुसे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आदी उपस्थित होते.
श्रीरामपूर काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. या दोन्ही गटात गेल्या अनेक दिवसांपासून बाद आहे. हा वाद काही केल्या मिटलेल्या नाही. तो वाद अनेकदा अनेक कार्यक्रमाच्या वेळी समोर आलेला आहे. इच्छुकांच्या मुलाखतीच्या वेळीही हा वाद सर्वांसमोर आलेला आहे. वादामुळे मात्र काँग्रेसची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी वागणे हे पक्षाच्या प्रतिमाला धक्का देणारे आहे.निवडणुकीच्या काळात तरी कार्यकर्त्यांनी शांत भूमिका घेणे गरजेचे आहे. आपल्यातच एक मत नसेल तर मतदार आपल्याला मत कशी देतील, अशी चर्चा सध्या कार्यकत्यांमध्ये सुरु आहे. कार्यकर्ते गोंधळ घातल होते. त्यावेळी मात्र त्यांच्या नेत्यांनी त्यांना आवर घालणे गरजेचे होते.
मात्र नेते मंडळींनी तशी भूमिका स्पष्ट घेतलेली दिसली नाही. यावरून नेते मंडळीची त्यांना साथ होती, असेच यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या नेत्यांवर कारवाई म्हणून सर्वांना डावलणे गरजेचे आहे. तसे मत पक्षाची ज्येष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे. मुंबई व दिल्लीला तसा प्रस्ताव तयार करून पाठविला जाणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
ज्यांना सार्वजनिक ठिकाणी कासे वागायचे कळत नाही, अशांना मतदारसंघाची जबाबदारी देणे चुकीचे आहे. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्यातील गटातील कोणाला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे
. तशी उमेदवारी कोणाला दिली, तर आम्ही पक्षाचे काम करणार नाही, असा थेट इशारा काही कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता पक्षापुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे. काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याने आता पक्षाला नवीन चेहऱ्याला संधी द्यावी लागेल की जुन्याला संधी दिली जाईल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
आमदार लहू कानडे व करण ससाणे समर्थक समोर आल्यानंतर सर्वच गोंधळ उडाला होता. यावेळी हेमंत ओगले समर्थकांनीही घोषणाबाजी केली. या सर्वा गोंधळामुळे श्रीरामपूरमधील काँग्रेस गटात मोठी गटबाजी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
ही गटबाजी संपविण्यासाठी बदल हा एकमेव पर्याय ठरणार असल्याचे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. नाही, तर पक्षाला त्याचा फटका बसणार आहे. यासाठी प्राथमिक दोन्ही गटांना एकत्र बसून त्यात तोडगा निघतो का याची तपासणी होणार आहे.
त्यानंतर मात्र संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती अहमदनगर शहरातही आहे.शहरातील काँग्रेसमधील काही जुने जाणकार नेते नव्या नेत्यांमुळे बाहेर पडलेले आहे. त्याचा आगामी निवडणुकीत पक्षाच्या मतदानावर परिणाम होणार आहे. त्यामुळे नगर शहरातील पक्ष सोडून गेलेल्या जी सर्वांना शहरातील पक्षाचे नेतृत्वाने व एकत्र आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाने पुढाकार घेऊन सर्वांना एक करणे आजच्या घडीला महत्वाचे आहे.