संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणींना योजनेपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी पासून दूर राहा- मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा देखील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी या मतदारसंघात प्रचारात वेग घेतल्याचे चित्र आहे.

Ajay Patil
Updated:
vikhe patil

Ahilyanagar News:- सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून संपूर्ण राज्यांमध्ये प्रत्येक मतदारसंघात आपल्याला प्रचाराचा धुराळा उडाल्याचे दिसून येत आहे.या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून प्रयत्न केले जात आहेत.

यामध्ये जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगतदार लढत होतील असे चित्र दिसून येत आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून जर आपण बघितले तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा देखील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी या मतदारसंघात प्रचारात वेग घेतल्याचे चित्र आहे.

तसेच त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देखील जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार सभांचे आयोजन करून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून संगमनेर तालुक्यात प्रचार दौरा आयोजित केलेला होता यानिमित्ताने त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
काळेवाडी येथील प्रचार सभेत काय म्हणाले विखे पाटील?
महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो काही जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर आता जनता विश्वास ठेवायला तयार नाही. कारण लोकसभेमध्ये जे काही फसवणूक झाली त्या फसवणुकीचा जनतेला अनुभव आला असून आठ हजार रुपये खटाखट देणारे आता कुठे पळून गेले हे मात्र आता समजत नाही.

तसेच संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणींना देखील योजनेपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला व या फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीपासून आता दूरच रहावे अशा प्रकारचे आवाहन देखील त्यांनी या निमित्ताने केले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर देखील निशाणा साधला व त्यावेळी बोलताना म्हटले की, आमच्यावर दहशतीचा आरोप करतात.

आमची दहशत विकासाची असून तुमच्यासारखी धाक दडपशाहीची नाही. कित्येक वर्ष तालुक्याची सत्ता स्थाने तुमच्या ताब्यात आहेत पण अद्याप देखील तुम्ही अनेक गावांना पाणी देऊ शकला नाहीत. आजही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत व 2005 सालच्या समन्यायी पाणी वाटप कायदा यांच्या काळातच लागू झाला व त्यामुळेच जिल्ह्याच्या पाण्याचे नुकसान झाल्याचा आरोप देखील त्यांनी थोरात यांच्यावर केला.

लोकसभा निवडणुकीमध्ये खोटा प्रचार करून तुम्हाला यश मिळाले असेल परंतु या विधानसभेत तशी परिस्थिती नसून आता मात्र तुम्ही जनतेला फसवू शकणार नाहीत. महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आणल्या गेला आहेत त्यावर जनतेचा विश्वास आहे. इतकेच नाहीतर लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला धडकी भरली आहे म्हणूनच या तालुक्यातील अनेक महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम केले.

गेली कितेक वर्ष तुम्ही सत्तेत असून देखील अशी एखादी फायद्याची योजना सुरू करावी हे तुम्हाला वाटले नाही. परंतु आता मत मागण्यासाठी तीन हजार रुपयांची घोषणा तुम्ही केली आहे पण ती किती फसवी आहे हे जनतेला समजले आहे.

कारण तुम्ही जनतेला लोकसभा निवडणुकी वेळी दिलेल्या आठ हजार रुपयांचे आश्वासन पूर्ण केलेले नाही असा देखील आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला.

तसेच महायुती सरकार शेतकरी आणि समाज घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून येणाऱ्या काळात कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करणार असून एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe