आईसोबत प्रातर्विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलींला चौघांनी छेडल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यातच महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटनांची दररोज नोंदी होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यामुळे समाजात महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. नुकतेच अशीच एक घटना श्रीरामपूर मध्ये घडलेली दिसून आली आहे.

सावत्र आईसमवेत शेतात शौचासाठी गेलेल्या 14 वर्षाच्या शाळकरी अल्पवयीन आदिवासी मुलीची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वत: पिडीत अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली असल्याने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात माळवाडगाव येथील चौघा जणांविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माळवाडगांव शिवारातील शेतात 24 जुलै 2021 रोजी रात्री 10 वाजता सावत्र आईसमवेत शौचास चालले असताना अंधारात बसलेल्या श्रीकांत दळे, आण्णा निंबाळकर, रवि निंबाळकर, शरद आसने (सर्व रा. माळवाडगांव) यांनी बाजुला ओढून विनयभंग करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी श्रीकांत दळे, अण्णा निंबाळकर, रवि निंबाळकर, शरद आसने या चौघांविरुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe