ओढणीने गळफास घेत तरूणाची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील लाख येथील अजय सुरेश जाधव (वय ३०) या विवाहित तरूणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी रात्री साडेअकरादरम्यान ही घटना घडली.

सोमवारी दुपारी राहुरी येथे शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी लाख येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजय नाशिक येथे नोकरीस होता, अशी माहिती मिळाली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास सहायक फौजदार प्रभाकर शिरसाठ करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe