अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणल्याने मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बुधवारी पारनेर बाजार समितीत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात उतरले.
पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात बुधवारी (13 ऑक्टोबर) रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात 25 हजार 858 कांदा गोण्यांची आवक झाली.
यावेळी एक ते दोन लॉटला प्रतिक्विंटल 3500 ते 4000 रुपये बाजारभाव मिळाला तर तीन नंबरला 3000 ते 3400, तर काही मालाला 2000 ते 2900 तर काही लहान कांद्याला 500 ते 1900 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.
पारनेर बाजार समितीत मागील काही दिवस कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या ऐरणी खाली करून कांदा विक्रीसाठी आणला,
तर काही शेतकऱ्यांनी नवीन कांदाही विक्रीसाठी आणला, यामुळे बुधवारी मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारभाव ही खाली आले. गेल्या काही दिवसापासून कांद्याला खुप कमी बाजारभाव होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम