Ahmednagar Police : जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.(Ahmednagar Police)

बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांची नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

त्यांच्या जागेवर सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले सायबर क्राईमचा कारभार बघणार आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या सहीनिशी आज आदेश निघाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe