पारनेरसाठी लंकेंऐवजी गीतांजली शेळके? शरद पवारांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय?पहा..

आगामी विधानसभेच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार हे सावधरीत्या पावले उचलत आहेत. पारनेर मतदार संघावर देखील शरद पवार यांचे विशेष लक्ष आहे. आगामी विधानसभेला पारनेरची जागा हातची जाऊ द्यायची नाही हे पवार यांनी नक्कीच ठरवलं असणार.

Ahmednagar Politics : आगामी विधानसभेच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार हे सावधरीत्या पावले उचलत आहेत. पारनेर मतदार संघावर देखील शरद पवार यांचे विशेष लक्ष आहे. आगामी विधानसभेला पारनेरची जागा हातची जाऊ द्यायची नाही हे पवार यांनी नक्कीच ठरवलं असणार.

येथे आमदारकीला कुणाला तिकीट मिळेल याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. येथे राणीताई लंके यांचे नाव जरी समोर येत असले तरी पवार साहेबांच्या डोक्यात काही वेगळाच खेळ सुरु असल्याचे दिसते.

आता अचानक येथे सहकारातील दिग्गज नाव गीतांजली शेळके यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. याचे कारण म्हणजे मुंबईत पार पडलेला कार्यक्रम.

काय घडलं मुंबईत
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जी. एस. महानगर बँक, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणाऱ्या उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळ अनावरण सोहळा ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी ते म्हणाले, स्व. गुलाबराव शेळके यांनी दुष्काळी भागातून येऊन कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन जिद्दीने सॉलिसिटर झाले. आर्थिक शिस्तीतून महानगर बँकेचा वटवृक्ष केला.

त्या लौकिकात स्व. उदय यांनी भर टाकली. आता संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी गीतांजली शेळके यांच्या पाठीशी उभे राहावे. सहकारातील धुरा त्या सक्षमरित्या पुढे नेतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

पवार सहकाराला मानणारे
सहकार क्षेत्र महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फुलवलं आणि बहरवलं देखील त्यांनीच असं म्हटलं जात. सहकार क्षेत्र हा त्यांच्या आवडीचा विषय. सहकाराच्या बाबतीत त्यांनी नेहमीच सर्वानाच मदत केली मग ते विरोधक असले तरी देखील सहकार्य केले.

त्यामुळे आगामी आमदारकीला सहकार क्षेत्रातील गीतांजली शेळके यांचे नाव त्यांच्या डोक्यात आहे का? अशा चर्चा सध्या सुरु झाल्यात. स्व. गुलाबराव शेळके असतील किंवा स्व. उदय शेळके असतील या दोघांचेही सहकारातील काम मोठे आहे तसेच पवार कुटुंबियांशी त्यांची सलगी आहे.

तसेच सहकाराच्या माध्यमातून जनसंपर्कही शेळके यांचा चांगला आहे. त्यामुळे त्यांचे नाव आगामी आमदारकीसाठी पवारांच्या मनात आहे का? अशा चर्चा सुरु झाल्यात.

खा. लंके यांची अनुपस्थिती
मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमास खा. निलेश लंके यांना देखील आमंत्रण होते. परंतु या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. ते या कार्यक्रमास का आले नाहीत याची माहिती समजू शकली नाही. परंतु हा चर्चा विषय झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe