अहमदनगर जिल्ह्यातली भेसळयुक्त दुधाचा टँकर बारामतीत पकडला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्रातून बारामती येथे आलेले भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. तब्बल २ लाख २९ हजार २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त गाईचे दूध पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाची कारवाई करत जप्त केले आहे.

जामखेड येथून टॅँकर (एम.एच ११/ए.एल ५९६२) मधून सुमारे ८ हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. परिमंडळ ५ चे सहायक आयुक्त (अन्न) अर्जून भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश,

बालाजी शिंदे आणि पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने बारामती येथे जाऊन छापा टाकून कारवाई केली. टँकरचालक संपत भगवान ननावरे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राचे दुध असल्याचे सांगितले.

पथकातील अधिकाऱ्यांनी दुधाची तपासणी केली. तेव्हा भेसळयुक्त तसेच कमी दजार्र्चे असल्याचे सिद्ध झाले.

त्यामुळे दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित २ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा साठा जप्त केला आहे. तसेच बारामती नगरपरिषदेच्या मैदानावर हे दुध नष्ट करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe