Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील तब्बल 18 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका महामार्गाच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे.
पाथर्डी तालुका हद्दीतून जात असलेला कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे नगर-पाथर्डी या मार्गाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. खरं पाहता या मार्गासाठी नगरकरांना तब्बल 18 वर्षे वाट पहावी लागली असून अखेरकार मुहूर्त सापडला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार या मार्गासाठी आता नव्याने निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. याशिवाय या मार्गासाठी विशेष बाब म्हणून 10 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात या मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.
आता काम सुरू झाल्यास मार्च 2023 पर्यंत काम पूर्णत्वास येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता नव्याने निविदा निघाल्या असून पाथर्डी तालुक्यातील काही गावात या मार्गासाठी नव्याने आरेखन होणार आहे.
या मार्गासाठी भूसंपादन हेतू प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मार्गात जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना 19 कोटी रुपये एवढी रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच गेल्या 18 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महामार्ग आता लवकरच नगरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
यामुळे नगर पाथर्डी यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोयीचे होणार असून भविष्यात हा मार्ग चौपदरीकरण करणार असल्याचे खासदार विखे पाटील यांचा मानस आहे.