जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल

Published on -

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून युवा नेते रोहित पवार यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील निवडणूक कार्यालयात दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी त्यांनी सहायक निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला.

त्यांच्या अर्जावर हभप वामन खराडे गुरुजी व हभप प्रकाशमहाराज जंजिरे यांनी अनुमोदक व सुचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, देवा खरात, रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार, मंजूषा गुंड, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंके, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

दुपारी एक वाजता पवार यांना सुवासिनींनी औक्षण केले. या वेळी उपस्थित युवकांनी पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News