पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील कुशाबा देवस्थानच्या व्होईकातील भाकीत जाहीर! काय सांगितले राज्याच्या राजकारण आणि पावसाबद्दल?

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सातवड हे गाव असून या गावापासून अतिशय जवळ व गर्भगिरी डोंगराच्या पायथालगत कुशाबा देवस्थान असून हे मोठ्या  प्रमाणावर प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ असून या ठिकाणी दर्शनाला अहिल्या नगरच नाहीतर पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सातवड हे गाव असून या गावापासून अतिशय जवळ व गर्भगिरी डोंगराच्या पायथालगत कुशाबा देवस्थान असून हे मोठ्या  प्रमाणावर प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ असून या ठिकाणी दर्शनाला अहिल्या नगरच नाहीतर पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.

नुकतीच या कुशाबा देवस्थानची यात्रा भरली असून या कुशाबा देवस्थानच्या यात्रेमध्ये व्होईकात करण्यात आले व या मध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील राजकारण आणि राज्यातील पडणारा पाऊस याबद्दल महत्त्वाचे असे भाकित वर्तवण्यात आले.

या व्होईकातील भाकितानुसार बघितले तर येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलथापालथ होईल व त्यातल्या त्यात महत्त्वाचे म्हणजे पावसाळा अजून देखील शिल्लक असून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत राहील अशा प्रकारचे शेतकऱ्यांना धडकी भरवणारे भाकित या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे.

 कुशाबा देवस्थानच्या यात्रेतील व्होईकात काय वर्तवण्यात आले भाकीत?

येत्या काळात राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल. पावसाळा अजूनही शिल्लक असून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत राहील, असे भाकीत (भविष्यवाणी) सातवड (ता. पाथर्डी) येथील कुशाबा देवस्थानच्या यात्रेतील व्होईकात करण्यात आले. सातवडपासून जवळ व गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी कुशाब देवस्थान आहे.

येथे कुशाबा देवाच्या दर्शनासाठी नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेनिमित्त आले होते. ही यात्रा शुक्रवारी झाली. धनगर समाज बांधव या यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

यात्रेत शुक्रवारी दुपारी १२ वाजता कुशाबा देवाचे भक्त पोपट व देवा यांनी व्होईक सांगितले. येत्या काळात निवडणुकांमध्ये राज्यातील राजकारणात उलथापालथ होईल. पावसाचा हंगाम अद्याप संपलेला नाही.

अनेक भागात येत्या काही दिवसात मोठा पाऊस पडेल. गहू, हरभरा, कपाशी आदी पिके चांगली येतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले. भविष्यवाणी ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कुशाबा देवाची यात्रा यशस्वीतेसाठी बंडू पाठक, कानिफ पाठक, संभाजीराव पाठक, सागर पाठक,

उत्तम अण्णा पाठक, राजेंद्र पाठक, कुशाभाऊ पाठक, किशोर वाघ, भाऊसाहेब वाघसह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ, यात्रा कमिटी, तरुण मंडळांनी परिश्रम घेतले.

कुशाबा देवस्थानचा तीर्थक्षेत्र ‘क’ वर्गात समावेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाविकांची सोय व्हावी यासाठी भविष्यात देवस्थानचा विकास करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे, असे सामाजिक कार्यकर्ते बंडू पाठक यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!