अहमदनगर जिल्ह्यात तरुणीचे अपहरण ! ‘तु गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, नाहीतर तुझ्या दाजीला जीवे ठार मारील…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : ‘तु गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल, अन्यथा तुझ्या दाजीला जीवे ठार मारील,’ अशी धमकी देऊन राहुरी शहरातून एका कॉलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी घडली. याबाबत एका तरुणावर विनयभंगासह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील १६ वर्षे २ महिने वय असलेली अल्पवयीन तरुणी परगावात राहते. शिक्षणानिमित्त गेल्या दोन वर्षांपासून ती तरुणी राहुरी तालुक्यातील एका गावात तीची बहिण व दाजी यांच्याकडे राहते.

ती एका कॉलेजमध्ये ११ वीच्या वर्गात शिक्षण घेते. येताना जाताना आरोपी तीचा नेहमी पाठलाग करायचा. दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ती तरुणी कॉलेजमध्ये येत असताना आरोपीने त्याच्या एमएच १७ एजे ५७०७ या इरटिगा गाडीतून पाठलाग केला आणि गाडी तीच्या कॉलेजसमोर उभी केली.

तरुणी गाडीजवळ आल्यानंतर आरोपी तीला म्हणाला की, ‘तु गाडीत बस आणि माझ्या बरोबर चल’ नाहीतर तुझ्या दाजीला जीवे ठार मारील’. अशी धमकी देऊन आरोपी राजन सुसे याने तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून गाडी राहुरी कॉलेजच्या दिशेने नेली.

आपल्याला पळून जायचे आहे, असे सांगितले; परंतु तरुणीने त्याला नकार दिला. त्यावेळी तरुणाला कोणाचा तरी फोन आल्याने त्याने गाडी राहुरी कॉलेज परिसरातून मागे फिरविली व त्या तरुणीला राहुरी बसस्थानकजवळील रिक्षा स्टँडवर सोडले.

घटनेनंतर तरुणीने तिच्या नातेवाईकांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी राजन चंद्रकांत सुसे याच्यावर विनयभंग व अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe