अहमदनगर जिल्ह्यात मध्यरात्री चौघा आरोपींनी एका घरात घुसत पत्नीसमोरच पतीला कोयत्याने वार करत मारून टाकले. पत्नीच्याही गळ्याला कोयता लावत आरडाओरड केल्यास व याची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.
हा सगळा थरार श्रीगोंदे तालुक्यातील कोथुळ या गावात घडला. अज्ञात चार व्यक्तीनी घरात घुसून सोमवारी (दि.३०) पहाटे तरुणावर कोयत्याने वार करत हत्या केल्याची घटना घडली. योगेश सुभाष शेळके (३३) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
तर त्याच्या पत्नीला गळ्यावर कोयता लावत कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देऊन अज्ञात हल्लेखोर पसार झाले. मृत तरुणाची पत्नी आरती योगेश शेळके (२६) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
समजलेल्या माहितीनुसार कोथुळ या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करत चौघांकडून युवकाची हत्या केली. त्यांनी फिर्यादी आरती शेळके याच्या राहत्या घरात प्रवेश केला.
पती पत्नी झोपले असताना अचानक फिर्यादीचे पती योगेश सुभाष शेळके यांच्या गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार केले. तर आरती यांच्या गळ्याला कोयता लावून तू ओरडली तर तुला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यानी घटनास्थळी भेट दिली असून उपविभागीय पोलीस अधिकारी , श्वान पथक कासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चौघांवर खून, शस्त्र अधिनियम तसेच इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.