श्रीगोंदा पंचायत समिती आढावा बैठकीत खा. निलेश लंकेनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर; प्रमुख अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने लंकेचा संताप अनावर

श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहामध्ये तालुक्यातील विविध प्रश्नांच्या बाबतीत आढावा बैठक घेण्याचे ठरले होते व त्यानुसार आढावा बैठक घेण्यात आली. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्यामुळे खासदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला.

Ajay Patil
Published:
nilesh lanke

Ahilyanagar News: सोमवारी श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहामध्ये तालुक्यातील विविध प्रश्नांच्या बाबतीत आढावा बैठक घेण्याचे ठरले होते व त्यानुसार आढावा बैठक घेण्यात आली. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्यामुळे खासदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. नगरपरिषदेबाबत वाचनालयातील अतिक्रमण तसेच घनकचरा व्यवस्थापन, नागरिकांचा विरोध असताना सुरू झालेल्या अभ्यासिकेचे काम,

कंत्राटी कामगारांचे रखडलेले वेतन इत्यादी बाबत अनेकांनी तक्रारी केलेल्या होत्या. तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत  खा. निलेश लंके यांनी बैठकीतच निर्णय करत दोन दिवसात काम सुरू करण्यास सांगितले.

 श्रीगोंदा पंचायत समिती आढावा बैठकीकडे प्रमुख अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने खा. निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

खासदार नीलेश लंके यांनी श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात सोमवारी विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली. मात्र, बैठकीकडे प्रमुख अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने संताप व्यक्त करत लंके यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. एका प्रश्नावर पोलिस निरीक्षक कुठे आहेत, असे लंके यांनी विचारले.

मात्र, ते गैरहजर होते. सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम उपस्थित होते. महसूल विभागातील समस्यांकडे लक्ष वेधले. त्यावर रेशनिंगच्या प्रश्नांबाबत उत्तर देण्यासाठी नव्याने हजर झालेले नायब तहसीलदार आले. नायब तहसीलदार म्हणाले मी कालच हजर झालो आहे, त्यावर लंके म्हणाले,

तुम्ही येथे काय ओळख परेड करण्यासाठी आले काय? नगर परिषदेबाबत वाचनालयातील अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, नागरिकांचा विरोध असताना सुरू झालेले अभ्यासिकेचे काम, कंत्राटी कामगारांचे रखडणारे वेतन याबाबत लोकांनी तक्रारी केल्या, तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत लंके यांनी बैठकीतच निर्णय करत दोन दिवसांत काम सुरू करण्यास सांगितले.

पंचायत समितीतील गाय गोठ्याचे ५० टक्के प्रस्ताव अपात्र कसे होतात, असा प्रश्न उपस्थित करत त्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, राजेंद्र म्हस्के, टिळक भोस, मनोहर पोटे, राजू गोरे, संजय लाकूडझोडे, हरिदास शिर्के, स्मितल वाबळे, बाळासाहेब दुतारे, शिवप्रसाद उबाळे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe