Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील विवाहित महिलेने पतीच्या आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ दिपक हरिदास काकडे रा. कोळी यांच्या फिर्यादीवरून पती राहुल आश्रु दरेकर, सासरा आश्रु चंद्रकांत दरेकर, सासु मथुरा आश्रु दरेकर, सर्व रा. बेंदवस्ती, हिरडगाव शिवार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैशाली राहुल दरेकर (वय २६), हिला लग्नाच्या दीड वर्षानंतर पती राहुल आश्रु दरेकर, सासरे आश्रु चंद्रकांत दरेकर व सासु मथुरा आश्रु दरेकर सर्व रा. बेंदवस्ती, हिरडगाव शिवार,
यांनी घरबांधणीसाठी, पिकअप घेण्यासाठी वडिलांकडून पैसे आणावेत, यासाठी लाथा बुक्यांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून, तिचा शारीरिक मानसिक छळ केला.
होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून वैशाली राहुल दरेकर हिने दि. १९ ऑक्टोबर रोजी शेतातील विहिरीजवळ असणाऱ्या खदाणीतील पाण्यात आत्महत्या केली असल्याची फिर्याद दि. २० ऑक्टोबर रोजी मयत महिलेचा भाऊ दिपक हरिदास काकडे यांनी दाखल केली.