कोरोना प्रतिबंधक नियमाचा भंग पडला महागात ! ‘या’ नगरपरिषदेकडून ८ दुकानांवर कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

मात्र  जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत दुकान उघडी ठेवणे त्या आठदुकानदारांना चांगलेच महागात पडले आहे. जामखेड शहरातील आठ नामांकित दुकानावर नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई करत ८० हजाराचा दंड वसूल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

मात्र शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने अर्ध शटर लावून चालू ठेवली जात होती. एककीकडे जामखेड शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्यात वाढ होत असताना काही दुकानदार नियमाचा भंग करून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दुकाने सुरु ठेवत असल्याने शहरातील गर्दी कमी होत नव्हती.

अखेर नगरपरिषदेने कडक भूमिका घेत शहरातील शनिवार व रविवारी शासनाच्या नियमाचा भंग करून दुकाने उघडे केल्याप्रकरणी आठ दुकानावर दंडात्मक कारवाई केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News