अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- `ऐकावं ते नवलच` संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथे सापाने चक्क 9 किलोमीटर मोटारसायकलवर प्रवास केला. बसला ना धक्का ? तर झालं असं की, पारेगाव गडाख येथील प्राथमिक शिक्षक अशोक गडाख हे दुचाकीवरून जाताना त्यांच्या समवेत सापानेही प्रवास केला.
ही घटना घडली शनिवारी १५ ऑगस्टदिवशी. गडाख यांनी दुचाकीच्या हेडलॅम्पमध्ये (खोपडी) सापाला बघाताच त्यांचा भीतीने थरकाप उडाला. मात्र, पारेगाव गडाख ते चिंचोलीगुरव दरम्यानच्या नऊ किलोमीटर प्रवासात साप दुचाकीच्या हेडलॅम्पमध्ये होता.

संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथील शिक्षक अशोक गडाख यांनी त्यांची दुचाकी घराच्या पडवीत पार्किंग केली होती. शनिवारी स्वातंत्र्य दिन असल्यामुळे सकाळी लवकर आटोपून ते दुचाकीवरून चिंचोलीगुरव येथे सकाळी वाजता प्राथमिक शाळेकडे गेले.
चिंचोलीगुरव मधील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पश्चिम सोसायटी, पूर्व सोसायटी, ग्रामपंचायत या ठिकाणांचे ध्वजारोहनाचे कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी शाळेत जावून शालेय कामकाज केले. शालेय कामकाज पूर्ण करून पावणे अकराच्या सुमारास दुचाकीवरून ते पारेगाव गडाख गावाकडे प्रवास करीत असताना
साप गाडीच्या हॅंडलवरून हातावरून खांद्याच्या दिशेने जाताना त्यांना दिसला. शिक्षक अशोक गडाख यांनी खांद्यावर हात ठेवल्यामुळे सापाने पुन्हा दिशा बदलून गाडीच्या हँडलवरून हेडलॅम्पमध्ये (खोपडीत) प्रवेश केला.
भेदरलेल्या अवस्थेत गडाख यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली व संतोष गडाख यांना मोबाईलवर संपर्क केला. दरम्यान संतोष गडाख, उत्तम गडाख व सोमनाथ गडाख यांनी त्या ठिकाणी येवून दुचाकीच्या खोपडीतून साप बाहेर काढला. त्यानंतर शिक्षक अशोक गडाख यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













