MLA Nilesh Lanke : अजित पवारांचे आ. लंके यांना पुन्हा गिफ्ट ! पारनेर शहरातील ‘या’ कामांसाठी कोट्यवधींचा निधी

Ahmednagarlive24 office
Published:
MLA Nilesh Lanke

MLA Nilesh Lanke : आ. निलेश लंके यांचा कामाचा तडाखा सुरूच आहे. आ. निलेश लंके हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. परंतु त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आ. लंके याना भरपूर निधी देत ‘आर्थिक’ पाठबळ दिले.

आता पारनेर शहरातील उद्यानासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आ. लंके यांनी सांगितले आहे. पारनेर नगरपंचायतीने या संदर्भात प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावास बुधवारी (२० डिसेंबर) प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. व आता या कामाची निविदा प्रसिद्ध होईल असेही आ. लंके यांनी सांगितले. शहरात अद्ययावत उद्यानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता व याला आता यश आल्याचे आ. लंके यांनी माहिती दिली आहे.

देवीभोयरे फाटा ते खडकी रस्त्याच्या कामासाठी ३६० कोटींचा निधी

हिवाळी अधिवेशनात देवीभोयरे फाटा ते खडकी (नगर) या रस्त्याच्या कामासाठी ३६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता पारनेर शहरातून जात असून, पारनेर शहराची हद्द ते सुपे या दरम्यानचा हा रस्ता चारपदरी होणार आहे.

आ. लंके यांनी यासाठी पाठपुरावा केला होता व त्याला आता यश आले आहे. या चारपदरी रस्त्याच्या मध्यभागी रस्ता दुभाजक, तसेच विजेचे खांबही बसविण्यात येणार असून लवकरच हे काम सुरु होणार असल्याचे आ. लंके म्हणाले.

लवकरच शाश्वत पाणी योजना राबवणार

पारनेरसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शाश्वत पाणी योजना. वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या पारनेर शहरवासीयांसाठी शाश्वत पाणी योजना राबवण्याचा शब्द दिला होता त्यानुसार पाणीयोजना मंजुर झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत मते मागणार नाही असे लंके म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe