जिल्हा काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी सर्व काँग्रेसजनांनी पुढाकार घ्यावा – प्रतापराव शेळके

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सर्व उपक्रम व कार्यक्रम प्रत्येक तालुका व गाव पातळीवर पोहोचविण्यासाठी व जिल्ह्यात काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील नव्या-जुन्या सर्व काँग्रेस जनांनी पुढाकार घ्यावा,

असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके यांनी केले. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगर तालुका व पारनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष सुरेश झावरे, नगर तालुका अध्यक्ष संपतराव म्हस्के,

पारनेर तालुका अध्यक्ष संभाजीराव रोहोकले, जयंतराव वाघ, भैय्या वाबळे, सुलतानभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात शेळके पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याला काँग्रेसचा गौरवशाली इतिहास असून पुन्हा एकदा जिल्ह्यात काँग्रेस उभी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन

तरुणांच्या वर जास्तीत जास्त जबाबदारी टाकण्या बाबतचे धोरण घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बोलताना जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे म्हणाले, यापुढील काळात तालुका काँग्रेस प्रत्येक पदाधिकाऱ्याला विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करून

लवकरच प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी गटप्रमुख व गण प्रमुख यांची निवड करण्यात येणार आहे. तरी पदाधिकाऱ्यांनी यासाठी काँग्रेस संघटनेत क्रियाशील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आपल्या भाषणात म्हणाले की, लवकरच जिल्हा काँग्रेस अंतर्गत असणाऱ्या

विविध सेलच्या संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. तरी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे धोरण काँग्रेस पक्षाचे असून त्यासाठी सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस चळवळीत सामील व्हावे असे आवाहन केले.

शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा युवक व विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर संघटना कार्यरत करून

पदाधिकारी नेमणूक करण्यासाठी तालुका पातळीवर समन्वयकांच्या नेमणूका करण्यात आल्या असून त्यांच्या अहवाला प्रमाणे नेमणुका करण्यात येतील असे जाहीर केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment