अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असल्याने जिल्ह्यात अनलॉकचे आदेश देण्यात आले आहे. मात्र अनलॉक होताच गर्दी उसळल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसू लागले आहे. यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका संभवण्याची शक्यता वाढू लागली आहे.
यामुळे संगमनेर मध्ये प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व व्यावसायिक, दुकानदार यांना कळविण्यात येते की,
स्थानिक प्रशासन व व्यापारी असोसिएशन यांचे संयुक्त बैठकीतील निर्णयानुसार संगमनेर तालुक्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कार्यालये सकाळी सात वाजेपासून ते सायं. ५ वा पर्यंत सुरू राहतील.
सायंकाळी पाच वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत, इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे निर्बंध दिनांक १० जून पासून लागू होणार आहेत,दरम्यान संगमनेर तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असली तरी नगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या संगमनेर तालुक्यात आढळून येत आहे.
कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक प्रशासन व व्यापारी असोसिएशन यांचे संयुक्त बैठकीत निर्बंध बाबत निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्रामp