सामाजिक भान ठेवत भिंगारचे सर्व राजकीय पक्ष एकवटले, रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राबवले रक्तदान शिबीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-सर्व राजकीय पक्षांमध्ये मतभेद असताना कोरोनाच्या संकटकाळात आपले मतभेद विसरुन भिंगार मधील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान व मोफत कोरोना चाचणी शिबीराचे आयोजन केले होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी घेण्यात आलेल्या या शिबीरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. तर रक्तदान करण्यापुर्वी रक्तदात्यांची मोफत एंटीजन किटद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली. भिंगार येथील कॅन्टोन्मेंट मराठी शालेत झालेल्या शिबीराप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ,

शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, भाजपाचे वसंत राठोड, वंचित बहुजनचे सागर चाबुकस्वार, काँग्रेसचे शामराव वाघस्कर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात सर्वच रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

तर शहरासह उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्व राजकीय पदाधिकार्यांनी हेवेदावे व मतभेद बाजूला ठेऊन भिंगारच्या राजकीय पदाधिकार्यांनी एक वेगळा सामाजिक संदेश देत नागरिकांना सुखद धक्का दिला. यावेळी सर्व राजकीय पदाधिकार्यांनी एकत्र येत हर काम देश के नाम! ही घोषणा दिली.

भरत पवार व मतीन सय्यद यांनी या सामाजिक उपक्रमासाठी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांना एकत्र आनले. मोफत कोरोना चाचणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी आयोजकांचे आभार माणून स्वयंफुर्तीने रक्तदान केले. शिबीराच्या आयोजनासाठी मळूराज आवटी, सिद्धार्थ आढाव, किशोर कटारे,

बंडू बेंद्रे, संजय गवळी, आसिफ शेख, विशाल बेलपवार, अभिजीत सपकाळ, नसीर शेख, वसीम शेख, अनंत रासने, उमेश शिंदे, संतोष गायकवाड, अ‍ॅड. शितल बेंद्रे, कांता बोटे, संगीता घोडके यांनी पुढाकार घेतला होता. शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. इंगोले, माया कोल्हे,

ज्ञानेश्‍वर मगर तर कोरोना चाचणीसाठी भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, प्रशांत गांधी, प्रतीक्षा जगदाळे, कीर्ती भापकर, आजिनाथ वांढेकर, अक्षय कानडे यांनी सहकार्य केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment