अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मुलीला फसवून वेळोवेळी अतिप्रसंग करणार्या आरोपी विरोधात पोलीसांकडे दिलेली फिर्याद मागे घेण्यासाठी दमबाजी करुन मानसिक त्रास देणार्या आरोपींच्या जाचास कंटाळून अल्पवयीन पिडीत मुलीने आत्महत्या केली.
आत्महत्येस प्रवृत्त करणार्या व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी पिडीत मुलीची आई मनीषा जार्हदास भोसले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन निवेदन दिले.
मनीषा जार्हदास भोसले ही पारधी समाजातील महिला पारनेर तालुक्यातील पिंप्री जेलसेन येथे वास्तव्यास आहे. मनीषा ही पती, मुल-बाळांसह राहत असून, मोलमजूरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत करते.
दि.28 मार्च रोजी कामावर गेल्यानंतर दिराचा मुलगा अक्षय भोसले व त्याच्या इतर साथीदारांनी घरी येऊन तीच्या अल्पवयीन मुलीला फुस लाऊन बळजबरीने घेऊन गेले व तिला आठ दिवस बरोबर ठेऊन तीच्यावर अतिप्रसंग केले.
यासाठी राहुल अर्पण भोसले, अर्पण जहारू भोसले, रवी अजगण काळे, राजू अजगान काळे, पिटी आदिक काळे, आरती आदिक काळे, आदिक अजगण काळे (सर्व रा. घाणेगाव ता. पारनेर) यांनी अक्षयला मदत करून अतिप्रसंग करण्यासाठी भाग पाडले.
या प्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी मुलीला पारनेर पोलीसांच्या ताब्यात दिले. तर आंम्हाला बोलावून मुलीचा जबाब घेण्यात आला.
तरीसुध्दा पारनेर तालुका पोलीस स्टेशनने सदर आरोपींना अटक केली नाही. अक्षयने मामाच्या घरी मुलीला घेऊन जावून मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे मनीषा जार्हदास भोसले यांनी निवेदनात म्हंटले आहे.
पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात तक्रार करुन नका, दाखल केलेली फिर्याद मागे घ्या, अन्यथा जीवे मारण्याची धमकी आरोपी नेहमीच देत होते. मोकाट आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याने मुली व कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
वेळोवेळी पोलीसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. शेवटी पिडीत मुलीने आरोपींच्या त्रासाला कंटाळून निघोज शिवारात (जाळी ओढा) येथे फाशी घेऊन आत्महत्या केली.
अजूनही आरोपी मोकाट असून, त्यांच्यापासून कुटुंबीयांना धोका आहे. तरी तातडीने आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी पिडीत मुलीची आई मनीषा जार्हदास भोसले यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews