अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- काेराना रुग्णांचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. पण सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. वेळीच उपचार घेतलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
काही अडचण वाटल्यास कारखाना व्यवस्थापनाशी त्वरित संपर्क करा, असे आवाहन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केले.
भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना कर्मचारी वसाहतीत माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कुकाणे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामेश्वर शिंदे, संचालक अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, डॉ. पूजा लोखंडे व डॉ. सृष्टी हिवाळे, जिजामाता नर्सिंग स्कूलचे प्राचार्य गणेश शिनगारे,
कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी कल्याणराव म्हस्के, बाळासाहेब आरगडे, पंजाब शिंदे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,
सुरक्षाधिकारी सुनील देशमुख, आरोग्य सहायक अशोक गर्जे, शाम देऊळगावकर, आरोग्य सेविका सुरेखा खंडागळे, छाया शिंदे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved