अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोना काळातील थक्क करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या कामावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे खूश आहेत. त्यांचे हे काम पाहून पवार यांनी पारनेर-नगर मतदारसंघातील रूग्णांच्या सोईसाठी कार्डियाक रुग्णवाहिका दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी ही रुग्णवाहिका आमदार नीलेश लंके यांच्याकडे शुक्रवारी पुण्यात सुपूर्द केली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तब्बल ६४ दिवस परप्रांतीय, परजिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख नागरीकांना जेवणाची सुविधा,
त्यांच्या प्रवासाची तसेच निवासाची व्यवस्था, ९५ लाख रूपयांचे किराणा वाटप तसेच कोरोना रूग्णांसाठी एक हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराची उभारणी असे अनेक उपक्रम आमदार लंके यांनी राबवले.
आमदार लंके यांच्या या कामाची दखल घेत शरद पवार यांनी पारनेरसाठी रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा झाला.
नीलेश लंके प्रतिष्ठाणकडे या रुग्णवाहिकेच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार लंकेेे के के रेंजच्या प्रश्नासंदर्भात दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी लंके यांनी कोरोना काळात त्यांनी राबवलेल्या उपक्रमांची माहीती पवारांना दिली.
एक हजार बेडचे पवारांच्याच नावाने सुरू करण्यात आलेले आरोग्य मंदिर, तेेथील रूग्णांना देण्यात येणारा प्रथिनयुक्त मांसाहार.
तसेच मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर खासदार पवार हे अवाक् झाले. अशा सुविधा दिल्यानंतर रूग्ण तेथून घरी जाणार नाहीत, अशी मिस्किल टिप्पणी पवार यांनी त्यावेळी केली होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved