जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात आढळला आठ फुटी अजगर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- आजही साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. त्याशिवाय प्रत्यक्ष सापाला पाहिलं की अनेकांची बोबडी देखील वळते. आठ फुटी अजगर जर तुमच्या दृष्टीस पडला तर काय होईल.

होय आठ फुटी अजगर. हा अजगर जंगलात, वनात नाही तर चक्क एका शेतकऱ्याच्या शेतात सापडला आहे. पाथर्डी रस्त्यावरील सोनेवाडी (ता. नगर) शिवारात तेथील सर्पमित्र नागेश जंगम यांनी सुभाष बेरड यांच्या शेतात पकडलेला आठ फुटी अजगर वन विभागामार्फत पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आला.

या भागात अजगर आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. या भागात कोणीतरी हा अजगर आणून सोडले असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नगर तालुक्यात देहरे व विळद परिसरात अजगरांचे वास्तव्य आहे.

भारतीय अजगर ही पंधरा फुटांपर्यंत वाढते. अलीकडे नगरमध्ये किल्ला परिसरातही अनेकदा अजगर आढळून आले आहे. वनविभागामार्फत हे पकडलेले अजगर पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, टाकळी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, निसर्गमित्र मंदार साबळे, नागेश जंगम, वनपाल सचिन शहाणे, वनपाल अशोक शर्माळे, वन मजूर बाबासाहेब बडेकर, कृष्णा बेरड आदी उपस्थित होते. अजगर साप हा घनदाट जंगलात व इतरत्र दिसतो.

मात्र मानवी वस्तीत म्हणजेच शहरांमध्ये अशाप्रकारे अजगर दृष्टीस आल्यामुळे येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने अशाप्रकारे सरपटणाऱया प्राण्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवावे, अशी मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe