अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : करोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
काल (गुरुवार) जिल्ह्यात करोना संसर्गाचा उद्रेक झाला. कोरोनाबाधितांचा विक्रमी आकडा समोर आला आहे. दिवसभरात सर्वाधिक 66 व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाची व नागरिकांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात एकूण 794 बाधित असून ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 280 झाली आहे. काल (गुरुवार) सकाळी आलेल्या अहवालानुसार नगर ग्रामीण 6, नगर मनपा 3, श्रीरामपूर तालुका 2, नेवासा तालुका 2, अकोले तालुका 1,
संगमनेर 1, श्रीगोंदा 1, राहुरी तालुका 1, जामखेड तालुका 2, भिंगार 1 आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश होता. यानंतर रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार नगर महापालिका क्षेत्रातील 13,
सोनई (नेवासा) येथील 10, संगमनेर तालुक्यातील 9, श्रीगोंदा तालुक्यातील 2, शेवगाव तालुक्यातील 1 आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले 9 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर मनपा क्षेत्रातील 3, राहाता 3, श्रीरामपूर 2 आणि पाथर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews