अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- राज्यात दूध आंदोलनाचा प्रश्न चिघळला असून यात राजकारण तापू लागले आहे. विविध पकक्षांच्यातर्फे एकमेकांवर आरोप करत आंदोलने सुरु आहेत.
याच पार्श्वभूमीवर दूध दरासंदर्भात खासदार विखे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी पारनेर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचा चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, केेंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा करता मग भांडून सत्तेत कशासाठी आलात, असा सवाल करीत भाजपच्या हाती राज्याची सत्ता द्या आम्ही शेतकऱ्यांना कसा न्याय देता येतो ते आम्ही दाखवून देऊ.
तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जे काम चालले आहे त्याचे चित्र पारनेरकरांनी राज्याला दाखवले आहे. येथे शिवसेना एका दिशेने, राष्ट्रवादी दुसऱ्या दिशेने तर काँग्रेस भाजपसोबत आहे.
दूध दरवाढीसाठी आघाडीच्या आमदाराने केंद्राच्या मदतीची मागणी केली आहे. हे सरकार जनता विरोधी आहे. त्यामुळे हे सरकार जास्त दिवस चालणार नाही असेही ते म्हणाले.
या आंदोलनादरम्यान , वसंत चेडे, अश्विनी थोरात, अमित जाधव, राहूल शिंदे, सचिन वराळ, सुनिल थोरात, चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर,
विश्वनाथ कोरडे, बाळासाहेब नरसाळे, रामचंद्र मांडगे, सुभाष दुधाडे, कृष्णाजी बडवे, बबन डावखर, डॉ. भाउसाहेब खिलारी, गंगाधर कोळेकर आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा