…आणि बिबट्या ऐवजी निघाली रानमांजर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-नगरपासून जवळच नगर-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या जांब गावाच्या परिसरात एका शेतातील झाडावर सकाळी बिबट्याचे पिलू बसले असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यास पाहण्यास या भागात मोठी गर्दी झाली.

मात्र, जवळपास पिलाची आई असेल या भीतीने झाडाच्या जवळ जाण्याची कुणी हिंमत करेना. तेथील उपसरपंच प्रवीण पवार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कर्पे यांनाही लांबून झाडावर बसलेले पिलू दिसले.

याबाबत वन विभागास माहिती देण्यात आली.काही वेळातच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, निसर्गमित्र मंदार साबळे, वनरक्षक कानिफ साबळे, तय्यब शेख चालक अक्षय ससे आदी घटनास्थळी पोहोचले. मंदार साबळे यांना लांबून झाडावर काहीतरी बसलेले असल्याचे जाणवले.

त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता झाडावर रानमांजर बसलेली होती. साबळे यांना पाहताच तिने उडी मारत शेतात धूम ठोकली. बिबट्या हा मांजर कुळातला असल्याने रंगसंगतीमुळे पाहणाऱ्यांना रानमांजर व बिबट्या यातील फरक लक्षात न आल्याने ते बिबट्याचे पिलू असल्याचे वाटले असावे, असे साबळे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment