अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नगरसेवक मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
मनोज कोतकर यांची सभापती बिनविरोध निवडीमुळे पुन्हा एकदा आमदार संग्राम जगताप यांचे महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व सिद्ध झाले. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या सर्व गोष्टींवर लक्ष होते.
आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसारच या सर्व हालचाली होत होत्या. शिवसेनेने स्थायी समिती सभापतीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
शिवसेनेकडून योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. राज्यातील महाविकास आघाडी अहमदनगर शहरात निवडणुकीनिमित्त समोरासमोर आले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्यात चर्चा झाली. शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक योगीराज गाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे स्थायी समितीच्या सभापतीपदी मनोज कोतकर यांची वर्णी लागली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved